Aditya Thackeray : आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही- आदित्य ठाकरे

| Updated on: May 10, 2022 | 7:18 PM

आमचं हिंदुत्व ‘रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये’ असं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही घटकपक्षांनी दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणार असा दावाही आदित्य यांनी यावेळी केला आहे.

नांदेड – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपण 10 जून रोजी अयोध्येत(Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे.राज्य सरकारने केलेल्या कामांसाठी आणि रामराज्यासाठी, प्रभुरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी आपण अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवाधर्म आहे. आमचं हिंदुत्व ‘रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये’ असं असल्याचंही आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही घटकपक्षांनी दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणार असा दावाही आदित्य यांनी यावेळी केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या(Hindutva) मुद्द्यावरुनही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

Published on: May 10, 2022 04:55 PM
प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा सवाल
Arvind Sawant | सरड्याला सुद्धा लाज वाटेल एवढे लोक रंग बदलतात : अरविंद सावंत