सरकारला ताकद दिली तर लाडक्या बहिणीला 3 हजार रुपये पण देऊ – एकनाथ शिंदे

| Updated on: Aug 17, 2024 | 5:11 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हजारापेक्षा देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. देण्याची नियत लागते. दानत लागते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा काही देण्याची वेळ येईल आम्ही मागे पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटतेय भीती परंतू काळजी करु नका तुमच्या पाठी आहे महायुती अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करताना भाषण केले. ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीने तुमच्या पुण्यात देखील खोटे पेशंट दाखविले, खोटे रुग्णालय दाखविले आणि घोटाळे केले होते. खिचडीत देखील घोटाळे केले होते. त्यांनी रुग्णांच्या तोंडची खिचडी पळविली. तुमच्या तोंडा घास पळवायचा होता म्हणून विरोधक कोर्टात देखील गेले. आनंदाचा शिधा आम्ही दिवाळी गणपती आणि दसरा असा वाटत असतो. रवा, मैदा, साखर,डाळ काय मोठं देतो आम्ही. त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले. कुठ फेडणार हे पाप..अशा लोकांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. तुम्हाला आता दीड हजार देतो. वर्षाला अठरा हजार होतात. तुम्ही जर सरकारला ताकद दिली तर दीडचे दोन..दोनचे पावणे दोन हजार होतील पुढे तीन हजार होतील असेही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. आमच्या बहिणींना लखपती करण्याचे योजना असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Published on: Aug 17, 2024 05:10 PM
जे खोडा घालायला आले त्या सावत्र भावांना जोडा दाखवा, एकनाथ शिंदे यांचा टोला
पुन्हा संधी दिली तर लाडक्या बहिणींना एकूण 90 हजार देऊ, अजितदादांची घोषणा