आगे आगे देखो होता है क्या, आमचं आरक्षण आम्ही मिळवणारच, जरांगे पाटील यांचा रॅलीत सरकारला इशारा
आमचं आरक्षण आम्ही घेणारच असे मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीला पोहचताच केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरु केला असून 13 जुलैपर्यंत हा दौरा चालणार आहे.हा पहिलाच टप्पा आहे अजून चार टप्पे शिल्लक असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हिंगोली : मराठा आणि ओबीसीत सध्या वाद सुरु आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर उद्या सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.यातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शनिवारपासून 13 जुलैपर्यंत जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा होणार आहे. आज हिंगोलीत जरांगे पाटील यांची रॅली पोहचली आहे. आमचं हक्काचं आरक्षण आम्ही मिळविणारच,मराठा बांधवांनी आपलं काम एक दिवस बंद ठेऊन आपली ताकद दाखवावी आणि आरक्षणाबाबाबत जनजागृती करावी असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आपलं हक्काचं आरक्षण मागत आहेत. मराठ्यांच्या आरक्षणावर त्यांनी गदा आणू नये आमचं आरक्षण आम्ही मिळविणार आहे.आता याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 06, 2024 02:26 PM