पुन्हा संधी दिली तर लाडक्या बहिणींना एकूण 90 हजार देऊ, अजितदादांची घोषणा
महिलांनी आमच्या सरकारला पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत एकूण नव्वद हजार रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करण्याची सरकारची योजना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सरकारने दोन महिन्याचे एकत्र असे तीन हजार रुपये महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. एक कोटी 30 लाख लोकांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आज पुण्यात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले. लाडक्या बहिणींना आम्हा पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत एकूण नव्वद हजार महिलांना देण्याची आमची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तु्म्ही म्हणाले मी यात राजकारण करतोय, काय राजकारण बिजकारण करीत नाही. परंतू हे खरं आहे ते मी सांगतोय असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 17, 2024 05:42 PM