Video | आम्ही चौकशा लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच, उद्धव ठाकरे यांचा इशारा
उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या महामेळाव्यात भाजपावर सटकून टीका केली आहे. पीएम केअर घोटाळ्यावर त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. कोरोना काळात आपण केलेल्या कामाचे जागतिक पातळीवर कौतूक झालं. तुम्ही आमच्या चौकशी लावताय. आम्ही उद्या तुमच्या चौकशा लावून तुम्हाला तुरुंगात टाकणारच असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिक येथे शिवसेनेचे महाअधिवेशन सुरु आहे. या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी कठारे टीका केली आहे. माझ्या शिवसैनिकांवर खोटे आरोप दाखल केले जात असले तरी ते झुकणार नाहीत. आम्ही तुमच्या चौकशी लावणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणार आहोत असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. मुंबई महा पालीकेतील घोटाळा काढताय. ठाणे पालिकेचा काढा, पुणे काढा, नागपूर, नाशिक पालिकेचाही घोटाळा काढा ? पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा. म्हणे पीएम केअर फंड खासगी फंड आहे. उद्या पंतप्रधान नसणार. तेव्हा तो फंड कुठे नेणार ? लाखो करोडो जमा केलेत ते कुठे घेऊन जाणार असाही सवाल ठाकरे यांनी केला आहे. आम्ही तुमच्या घोट्याळ्याची बातमी काढली की ? एक दिवस बातमी चालते. वरुन फोन आला की बंद होते. आपल्याकडे कॅगचा अहवाल आहे. कोरोना काळात मृतांना जीवंत दाखवून मेलेल्यांच्या मढ्यावरील लोणी तुम्ही खाल्येत. नालायकांनो रुग्णवाहीकेतही तुम्ही घोटाळा केला आहात.