Santosh Deshmukh Murder : आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत… संतोष देशमुखांचे भाऊ काय म्हणाले ?
सगळ्या आरोपींवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा लागत नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही, असे ते म्हणाले. हे सगळे गुन्हेगारी वृत्तीची लोक आहेत, त्यांच्यासह वाल्मिक कराडवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आम्हाला न्याय हवा, जोपर्यंत सर्वांना फाशीची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणारा नाही असा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला असून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला. याप्रकरणी आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सगळ्या आरोपींवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा लागत नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही, असे ते म्हणाले. हे सगळे गुन्हेगारी वृत्तीची लोक आहेत, त्यांच्यासह वाल्मिक कराडवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आम्हाला न्याय हवा, जोपर्यंत सर्वांना फाशीची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणारा नाही असा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला.
Published on: Jan 11, 2025 03:33 PM