गणेभक्तांचं संरक्षण मंदिर प्रशासनाचा स्तुत्य काम, पहा काय केलं ऐन उन्हाळ्यात

| Updated on: Apr 19, 2023 | 10:26 AM

नागपुरातील कडाक्याच्या उन्हापासून गणेभक्तांचं संरक्षण व्हावं, या उद्देशाने येथील टेकडी मंदिर प्रशासनाने शक्कल लढवली आहे. मंदिरात तुषार सिंचन लावण्यात आलंय

नागपूर : एकीकडे अवकाळीमुळे राज्याला फटका बसला. तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. या ऊन पावसाच्या खेळाने लोक हैराण झाले आहेत. विदर्भातील नागपुरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा वाढल्याने उन्हामुळे जनता अक्षरश: त्रस्त झाली. याचा परिणाम अनेक धर्मस्थळांवर पहायला मिळत आहे. मात्र नागपुरातील कडाक्याच्या उन्हापासून गणेभक्तांचं संरक्षण व्हावं, या उद्देशाने येथील टेकडी मंदिर प्रशासनाने शक्कल लढवली आहे. मंदिरात तुषार सिंचन लावण्यात आलंय. वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मंदिर परिसरात थंड पाण्याचे स्प्रिंक्लर्स लावण्यात आलेय. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात मोठी वाढ झालीय. पारा 41 च्या पुढे गेलाय. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात थंड पाण्याचे स्प्रिंक्लर्स लावण्यात आलेय.

Published on: Apr 19, 2023 10:26 AM
पुणे जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; शिक्षणाचा खेळखंडोबा
वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार गोदा आरती, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुणाचा निर्णय?