Ganesh Festival : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! कोकणवासियांसाठी धावणार 22 विशेष गाड्या
तर गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाकडे गावी जातात. तर त्यांची प्रवासात पहिली पसंती हे रेल्वेला असते. तर अवघ्या महिन्याभरावरच गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने कोकणकर आतापासून जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करताना दिसत आहे.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील व विशेष करून कोकणातील सर्वात मोठा उत्सव असतो. नोकरदार चाकरमानी हे मुंबईत मोठ्या संख्येने राहतात. तर गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाकडे गावी जातात. तर त्यांची प्रवासात पहिली पसंती हे रेल्वेला असते. तर अवघ्या महिन्याभरावरच गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने कोकणकर आतापासून जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करताना दिसत आहे. तर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात गणेश उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाकडून याचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरही गणेशोत्सव काळात विशेष गाड्या चालवणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात 22 विशेष गाड्यांची भर पडली आहे.
Published on: Aug 13, 2023 10:37 AM