Special report : संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या शिंदे गटाची चिंता वाढवणाऱ्या?

| Updated on: Aug 28, 2022 | 7:49 AM

संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या शिंदे गटाची चिंता वाढवणाऱ्या तर नाहीत ना? अशी कुजबूज सुरु झालीय. दुसरीकडे औरंगाबादेतच आदित्य ठाकरे यांचा दौरा नुकताच झाला होता. तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

औरंगाबाद : शिंदे (Eknath Shinde Group) गटातील मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमाला फारसे लोक नव्हते, असं व्हिडीओत दिसतंय. कार्यक्रमातील खुर्च्याही रिकाम्या होत्या. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या शिंदे गटाची चिंता वाढवणाऱ्या तर नाहीत ना? अशी कुजबूज सुरु झालीय. दुसरीकडे औरंगाबादेतच (Aurangabad) आदित्य ठाकरे यांचा दौरा नुकताच झाला होता. तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दोन राजकीय चित्रांमधील फरक भविष्याचे सुतोवाच करतोय का? रिकाम्या खुर्च्यांचा आणि भरगच्च सभेचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला फटका बसणार? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. पाहूयात, याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट..

Special Report : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुणे दौरा सोशल मीडियात चर्चेचा विषय का बनला?
“खोड्या बंद करा, असली दादागिरी चालणार नाही!”, शहाजीबापू पाटलांचा अधिकाऱ्याला फोन