Amit Shah | अमित शहा यांनी असं काय सांगितलं की, मुख्यमंत्री मान हलवत राहिले

| Updated on: Sep 05, 2022 | 2:31 PM

Amit Shah | देशाचे गृहमंत्री अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत होते, त्यावेळी या दोघांत गुप्तगू झाली.

Amit Shah | देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)आजपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबत होते, त्यावेळी या दोघांत गुप्तगू झाली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोघेही उपस्थित होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पुढचा दौऱ्यासाठी तयारी करताना अमित शहा त्यांच्या ताफ्यामधील कारजवळ आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सोबत होते. त्यावेळी दोघांमध्ये गुप्तगू झाली. आता दोघांमध्ये नेमकी कशावरुन चर्चा रंगली हे काही समोर आले नाही. दोघांच्या राजकीय चर्चांविषयी ना ना चर्चांना ऊत आला आहे. 20 जून 2022 रोजी पासून शिवसेनेतील (Shivsena) 40 आमदारांची मोट बांधत शिंदे यांनी बंड केले आणि आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपशी घरोबा करत त्यांनी नवीन सरकार स्थापन केले.

Published on: Sep 05, 2022 02:31 PM
Aurangabad Robot Ganpati Arti | मेटलमन कंपनीत रोबोटच्या माध्यमातून गणपतीची आरती
Ambadas Danve | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी