‘सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत….,’ काय म्हणाले अंबादास दानवे
महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे विधानसभेत यंदा २० आमदार निवडून आलेले आहेत. या आमदारांची नुकतिच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि स्वबळावर निवडणूका लढविण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रीया दिलेली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांची एक बैठक झालेली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना या बैठकीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलेले आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आता शिवसेनेचे २० आमदार जरी निवडणूक आलेले असले तरी शिवसेना एक आमदारावरही महाराष्ट्रात लढलेली आहे अशी आठवण करुन दिलेली आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची घोषणा केली जाणार आहे. याबाबत शिवसैनिकांना स्वबळावर लढण्याचा आग्रह केल्याबद्दल विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की शिवसैनिकांना आपली भूमिका मांडली आहे. परंतू असा निर्णय त्या-त्या भागातील समीकरणे पाहून घेतला जातो. उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली आहे. ते नंतर परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतील असे दानवे यांनी सांगितले. नवीन सरकारने आता लाडकी बहिणीला ३००० मानधन करावे, शेतकऱ्यांची नमो योजना आहे त्याची रक्कम वाढविण्याचा निर्णय घ्यावा यासाठी आम्ही त्यांच्या मागे लागणारच आहे असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.