‘… त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे…,’ काय म्हणाले सुरेश धस

| Updated on: Dec 31, 2024 | 2:09 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले वाल्मिकी कराड सीआयडीला शरण आले आहेत. यानंतर हे प्रकरण लावून धरणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाल्मिकी कराडला शरण यावे लागले आहे. त्याबद्दल आपण मनापासून फडणवीस यांचे आभार मानतो असे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी कराड शरण आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात सीआयडीने जी भूमिका घेतली त्यामुळे दबाव आल्याने कराड शरण आले आहे. आता कोर्टाकडे सीआयडीने प्रॉपर्टी सिल करण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे. लवकरात लवकर संपत्ती जप्त झाल्या पाहीजेत. त्याशिवाय या आकाच्या अन्य गुन्ह्यांना वाचा फुटणार नाही असेही भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत त्यांनाही अटक झाली पाहीजे. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी संतोषला मारहाण करण्यात पुढाकार घेतला होता. विष्णू चाटे याला 120 ब मध्ये घेतले आहे. या सर्वांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Published on: Dec 31, 2024 02:08 PM
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल
सरकारच्या दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी