लाडकी बहिण योजनेने पुरुषांच्याही पोटात दु:खतय, पण आता महिलांचे…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी या योजनेची सुरुवात पुण्यात झाली. एक कोटी 30 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले.
आमचे सरकार गेल्यानंतर आलेल्या महाविकास आघाडीने पहिले जर कोणते काम केले असेल ते म्हणजे मी सुरु केलेल्या सर्व योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. आम्ही बहीण माझी लाडकी ही योजना सुरु केली तरी काही महिन्यात बंद होईल अशी टिका विरोधकांनी केली. परंतू अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी बजेटमध्ये सर्व आर्थिक तरतूद केलेली आहे.केंद्र सरकारने काले पुणे आणि ठाणे मेट्रोला मंजूरी दिली आहे. पुढील पाच वर्षांच्या बजेटची तरतूद करणे आताच शक्य असते तर आम्ही ती नक्की केली असती. याचं सरकार जेथे आहे तेथे यांना ही योजना राबविता आलेली नाही. कर्नाटकने नुसती घोषणा केली परंतू योजना सरु केली नाही.आमचे राज्य असलेल्या मध्य प्रदेशात ही योजना सुरु आहे.महिलांना अधिकार मिळत असताना अनेक लोकांच्या पोटात दुखतं. पुरुषांच्याही पोटात दुखतं कारण कारण त्यांना वाटतं इतकी वर्षे आम्ही सत्ता गाजविली आता यांच्या हातात अधिकार येणार. परंतू आता महिला करतील, महिला ठरवितील तिच दिशा राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना आरक्षण मिळवून दिल्याने राजकारणात आता महिलांचे राज्य येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजनेचा शुभारंभ करताना स्पष्ट केले.