‘वन नेशन वन इलेक्शन’ वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
केंद्र सरकारने त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'वन नेशन वन इलेक्शन'ला मंजूरी दिलेली आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे नेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आपले मत मांडले आहे.
देशात आधी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रमाणेच निवडणूका होत होत्या. परंतू आता या निर्णयाने ज्या राज्यांना मध्यावती निवडणूका घ्यावा लागतील त्यांचे नेमके काय होणार आहे या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही. तसेच ज्या राज्यात काही कारण सरकार पडले किंवा सत्तांतर झाले त्या राज्यांचे काय होणार आहे याची काही कल्पना मतदारांना देण्यात आलेली नाही असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. केंद्राने महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले परंतू त्याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार असाही प्रश्न आहे. जनगणना कधी होणार आहे. त्यावेळी डिलिमिटेशन होणार का ? या सर्वांची उत्तरे जनतेला मिळायला हवीत असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 12, 2024 06:51 PM