मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अखेर विधानसभा निवडणूकीला उमेदवार उभे करण्याचा निर्णय आज घेतला आहे. जिथे ताकद आहे तिथेच जोर लावायचा, जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा. फक्त एससी एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही आमच्या उमेदवारांकडून बाँड लिहून घेणार आहे..तसेच व्हिडिओग्राफी देखील करून घेणार. पण हे काही व्हायरल करणार नाही. कारण आपल्याला कुणाला अडचणीत आणयचे नाही असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आता आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत आणि निवडून येणार तेवढेच निवडणूक लढणार आहेत. लढण्याची इच्छा अनेकाची असते. परंतू आपल्याला समाज जपायचा आहे. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा. पण उमेदवार पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आपल्याला थोडे उमेदवर द्यायचे आहेत. आपल्या आपली माणसं तेथे आपली कामे करण्यासाठी पाठवायची आहेत. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर संपूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही म्हणून निवडून येणाऱ्या जागांवर चर्चा करू असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.