Paithan : मुख्यमंत्र्यांच्या सभेत पैठणकरांना काय मिळाले? त्या घोषणा कोणत्या

| Updated on: Sep 12, 2022 | 8:11 PM

पैठणची साडी ही देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. या साडीच्या उत्पादनासाठी क्लस्टर मिळवून देणार तर साडी उत्पादनासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर पैठणच्या देवस्थान विकासासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी आहे. त्यावर देखील मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद :  (CM Ekanth Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या सभेत (Paithan) पैठणकरांना काय मिळणार याकडे सर्व मतदार संघाचे लक्ष लागले होते. पैठणची साडी ही देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. या (Paithan Saree) साडीच्या उत्पादनासाठी क्लस्टर मिळवून देणार तर साडी उत्पादनासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर पैठणच्या देवस्थान विकासासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी आहे. त्यावर देखील मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. व शहराच्या पाणीपुरठ्यासाठीही पैसे कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 12, 2022 08:11 PM
Eknath Shinde : सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर..! म्हणाले…
Eknath Shinde : मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली, हे पाप कुणाचे? मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?