Devendra Fadanvis : सागर बंगल्यावरील गणरायाला असा हा निरोप, सुरक्षतेबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
गणेश विसर्जन म्हटले की तो एक नियोजनाचा भाग असून राज्यात कुठेही दुर्घटना घडणार नाही, त्याअनुषंगाने सूचना दिल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून केवळ गणेश विसर्जनाच्या बाबतीतच हा विभाग कार्यरत होता असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. तर कोरोनानंतर गणेश भक्तांचा उत्साह वाढला असून रात्रभर मिरवणूकांना परवानगी राहणार आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभर गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. गेल्या दहा दिवस राजकीय नेत्यांनी विविध सार्वजनिक मंडळात हजेरी लावली होती. तर आज घरच्या (Ganesh Visarjan) बाप्पांचे मोठ्या उत्साहात विसर्जनही केले. (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर बंगल्यावरील बाप्पांचे विसर्जन केले. यावेळी त्यांनी राज्यात गृह विभागाने कशी यंत्रणा राबवली आहे हे देखील सांगितले. गणेश विसर्जन म्हटले की तो एक नियोजनाचा भाग असून राज्यात कुठेही दुर्घटना घडणार नाही, त्याअनुषंगाने सूचना दिल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून केवळ गणेश विसर्जनाच्या बाबतीतच हा विभाग कार्यरत होता असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. तर कोरोनानंतर (Ganesha Devotee) गणेश भक्तांचा उत्साह वाढला असून रात्रभर मिरवणूकांना परवानगी राहणार आहे.
Published on: Sep 09, 2022 07:14 PM