Ahmednagar : काय सांगता..! सोन्याच्या कपामध्ये ग्राहकांना मिळणार चहा
तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि 10 तोळ्यांचे दोन कप ठेवण्यात आला असून आता प्रत्येकाला यात चहा पेण्याचा आनंद घेता येणार आहे. ग्राहकांमध्ये एक वेगळे समाधान असून यामुळे व्यवसायात वाढ होईल असा आशावाद पुजारी यांना आहे. त्यामुळे पारनेरसह लगतच्या भागातील ग्राहक चहा पिण्यासाठी दाखल झाले तर त्यांना सोन्याच्या कपात चहा मिळणार आहे.
अहमदनगर : हौसेला नाही मोल..अगदी या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील पारनेर येथील उद्योजक स्वप्नील पुजारी यांनी ग्राहकांसाठी चक्क सोन्याच्या कपात चहा देण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल पाच लाखाच्या कपात ग्राहकांना चहाची चव चाखता येणार आहे. सोमवारपासून त्यांनी प्रेमाचा चहा या दुकानचे उद्घाटन केले आहे. महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य ग्राहकाला सोन्याच्या कपात चहा प्यायला मिळणार आहे. पारनेर येथील चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि 10 तोळ्यांचे दोन कप ठेवण्यात आला असून आता प्रत्येकाला यात चहा पेण्याचा आनंद घेता येणार आहे. ग्राहकांमध्ये एक वेगळे समाधान असून यामुळे व्यवसायात वाढ होईल असा आशावाद पुजारी यांना आहे. त्यामुळे पारनेरसह लगतच्या भागातील ग्राहक चहा पिण्यासाठी दाखल झाले तर त्यांना सोन्याच्या कपात चहा मिळणार आहे.