Maulana Mufti Mohammed Ismail | दादा भूसें, मौलाना मुफ्ती मोहम्मद यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
अजून पक्षश्रेष्टींचा आदेश आलेला नाही. आणि त्यांचा जो आदेश असेल तो आपल्याला मान्य असल्याचे मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.
मालेगाव : राज्यातील 6 खासदारांचा हा कार्यकाळ असून येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यावरून राज्याचे सत्ताकारण चांगलेच तापलेले आहे. तर अपक्षांसह छोट्या मोठ्या पक्षांनी आपल्याच उमेदवाराला मत द्यावे यासाठी भाजपसह शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. तर अपक्ष अमदारांच्या (Independent MLA) भेटी घेतल्या जात आहेत. याचअनुशंगाने कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नुकतीच आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (Maulana Mufti Mohammad Ismail) यांची भेट घेतली होती. त्यावर आमदार ईस्माईल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. आमदार ईस्माईल म्हणाले, मागे सत्ता स्थापनेवेळी आम्ही शिवसेनेला मतदान केलं नव्हतं ते आमच्या पक्षाच्या नितीनुसार. पण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत राज्याच्या विकासात आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगितलं होतं. तो आता क्षण आला आहे. पण अजून पक्षश्रेष्टींचा आदेश आलेला नाही. आणि त्यांचा जो आदेश असेल तो आपल्याला मान्य असल्याचे मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.