देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का? अमित शाहांच्या बैठकीत काय झालं?

| Updated on: Jun 08, 2024 | 10:38 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रात एनडीएच्या खराब कामगिरीनंतर फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

New Delhi : राज्यातील एनडीएच्या पराभवाची जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या निर्णय देखील घेतला होता. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील रोडमॅप तयार करुन सरकारमध्ये काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे .

फडणवीस आणि शाहांच्या बैठकीत काय झालं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास राजीनामा देऊ नये, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबलावर परिणाम होईल. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर आपण सविस्तर बोलू असं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 08, 2024 10:38 AM
Maharashtra Rain Update : राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा
नाव घेऊन पाडणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा