Raja of Lalbagh : लालबागच्या राजाच्या दानपेटीत नेमकं काय दान?
सोन्याची बिस्कीटही लालबागच्या राजाला दान देण्यात आलीत. यावरून लालबागच्या राजाला मानणाऱ्यांची संख्या लक्षात येते. दान दाते हे मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाला दान करतात.
मुंबईतील लालबागचा राजाची दानपेटी उघडण्यात आली. या दानपेटीत पैसेच पैसे दिसून आले. या दानपेटीत पैशांची माळ सापडली. कुणी चिल्लर तर कुणी ठोक पैसेही दानपेटीत टाकले आहेत. विशेष म्हणजे चांदी आणि सोन्याच्या वस्तूही लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्यात. मौल्यवान अशा वस्तू दान करण्यात आल्या आहेत. कुणी सोन्याचा मुकुट तर कुणी सोन्याची पावलं दान केली आहेत. चांदीचा छत, चांदीची मूर्ती, सोन्याचा गोफ, अशी मौल्यवान वस्तूंची या दानपेटीत सापडल्यात. सोन्याची बिस्कीटही लालबागच्या राजाला दान देण्यात आलीत. यावरून लालबागच्या राजाला मानणाऱ्यांची संख्या लक्षात येते. दान दाते हे मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाला दान करतात.
Published on: Sep 01, 2022 08:48 PM