असं काय घडलं? पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं?

| Updated on: Oct 19, 2023 | 7:52 PM

ड्रग माफिया ललित पाटील यांच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणाऱ्यांची तोंडे बंद होतील असा इशारा दिला. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मी शिक्षिका म्हणून मला हे प्रश्न पडताहेत. हे प्रश्न मी कायद्याच्या चौकटीत राहून विचारते असा टोला लगावला.

नागपूर | 19 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील काल पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे काही माहिती आली आहे. बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील. हा काय आहे हा? हा इशारा आहे का? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी काल चाळीस सेकंदाचा बाईट दिला. पण, काल माझ्या मेंदूत काही घुसत नव्हतं. कारण माझ्या भावाचा अपघात झाला होता. मी disturb होते असे सांगताना त्या भावूक झाल्या होत्या. तुम्ही म्हणालात की बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील. काय आहे हा? हा इशारा आहे. धमकी आहे. तोंड बंद कराल म्हणजे काय कराल? संपवून टाकाल. पण, मी डगमगणार नाही. घाबरणार तर अजिबात नाही असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Published on: Oct 19, 2023 07:51 PM
सुनील कावळे यांचे बलिदान… मनोज जरांगे पाटील झाले आक्रमक, ‘आता तुमच्या…’
‘कुटुंबावर, पक्षावर हल्ला म्हणजे नक्कीच आमच्यात…,; सुप्रिया सुळे यांचा कुणावर हल्लाबोल?