उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पदाचे भवितव्य निवडणूक आयोगाच्या हाती, आज निर्णय अपेक्षित?
उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद आणि धनुष्यबाण चिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. दुपारी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात युक्तिवाद सुरू होणार आहे.
मुंबई : येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे ( uddhav thackaery ) यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण पक्षाची प्रतिनिधी सभा घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला तर तो उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारा निर्णय असेल. मात्र, परवानगी नाकारली तर हा मोठा धक्कादायक निर्णय मानण्यात येईल.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयीचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयीची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती केली होती.
Published on: Jan 17, 2023 11:16 AM