Ambadas Danve : याकूब मेमनच्या कबरी दिवे लावणाऱ्यांबद्दल शिवसेनची मागणी काय?

| Updated on: Sep 08, 2022 | 8:39 PM

याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थीव हे त्याच्या नातेवाईकांनाच द्यायला नाही पाहिजे होते असेही दानवे यांनी सांगितले आहे. खरे पहायला गेले तर पाच वर्षापूर्वीच या ठिकाणी मार्बल लावण्यात आले होते तर दिवाबत्ती ही गेल्या 15 दिवसांमध्ये केली असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. त्या भागातील नगरसेवकही भारतीय जनता पार्टीचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेवर केले जात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यामुळे यामध्ये जो कोणी दोषी असले त्यावर कारवाई करण्याची मागणी आंबादास दानवे यांनीच केली आहे.

मुंबई : (Yakub Memon) याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिव्यांवरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. एलईडी दिवे हे (Thackeray Government) ठाकरे सरकारच्या काळात लावले गेले असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी आता LED दिवे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे (Ambadas Danve) विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केली आहे. शिवाय याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थीव हे त्याच्या नातेवाईकांनाच द्यायला नाही पाहिजे होते असेही दानवे यांनी सांगितले आहे. खरे पहायला गेले तर पाच वर्षापूर्वीच या ठिकाणी मार्बल लावण्यात आले होते तर दिवाबत्ती ही गेल्या 15 दिवसांमध्ये केली असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. त्या भागातील नगरसेवकही भारतीय जनता पार्टीचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेवर केले जात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यामुळे यामध्ये जो कोणी दोषी असले त्यावर कारवाई करण्याची मागणी आंबादास दानवे यांनीच केली आहे.

Published on: Sep 08, 2022 08:39 PM
Pune : गणेश विसर्जनासाठी पुण्यात 5 हजारांचा पोलीस बंदोबस्त, कसे होणार विसर्जन..!
Heavy Rain : राज्याच पावसाचे पुनरागमन, खरीप पिकांना मोठा दिलासा