मुख्यमंत्री शिंदे यांना केंद्राचा ‘तो’ निरोप काय? अजितदादा यांना भाजपमधून विरोध, कुणी केला दावा?

| Updated on: Oct 28, 2023 | 5:03 PM

राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. तेच बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर मुख्यमंत्री येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू.

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावेच लागेल. दुसरीकडे अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. सातत्याने गेल्या पाच वर्षापासून मी पुन्हा येईन असं ते सांगत आहेत. पण त्यांना पुन्हा यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे स्थान होते ते धुळीस मिळाले आहे. ही सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावंच लागेल. त्यांना राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो असेही ते म्हणाले.

Published on: Oct 28, 2023 05:03 PM
‘असा चिल्लरपणा…’ कॉंगेस आमदार संतापले, ‘या’ चार बड्या नेत्यांविरोधात आणणार हक्कभंग
MUKESH AMBANI : ‘आमच्याकडे सर्वोत्तम शूटर…’, उद्योगपती मुकेश अंबानी यांना कुणी दिली धमकी?