Eknath Shinde : वेदांता प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट काय? एकनाथ शिंदेंने सांगितली वेगळीच कहाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेदांता प्रकल्पावरुन गौप्यस्फोट

Eknath Shinde : वेदांता प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट काय? एकनाथ शिंदेंने सांगितली वेगळीच कहाणी

| Updated on: Sep 16, 2022 | 9:48 PM

एकनाथ शिंदे यांनी तर याबाबत गौप्यस्फोट केला आहे. हा प्रकल्प शिंदे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजेच राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असतानाच तळेगावहून गुजरातला गेल्याचे सांगितले आहे.

मुंबई :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्पावरुन सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. वेदांतासारखा प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्देवी असल्याचे म्हणत आ. आदित्य ठाकरे यांनी सर्वात आगोदर (State Government) राज्य सरकारवर टीकास्त्र केले होते. त्यानंतर विरोधक हे सरकारवर तुटून पडले होते. विरोधकांनी हे कृत्य शिंदे सरकारच्या काळातच झाल्याचे सांगितले होते.त्यानंतर आता (Eknath Shinde) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यामागची कारणे देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर याबाबत गौप्यस्फोट केला आहे. हा प्रकल्प शिंदे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजेच राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असतानाच तळेगावहून गुजरातला गेल्याचे सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या काळात सहकार्य न मिळाल्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगितले आहे. तर डबल इंजिनच्या सरकारमधले एक इंजिन तर फेल झाल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

Published on: Sep 16, 2022 09:48 PM
Aaditya Thackeray : वेळ निघून गेल्यावर त्यांना आठवेल राज्याचे झालेले नुकसान..! आदित्य ठाकरेंचा निशाणा कुणावर?
Dapoli मध्ये दापोलीत Bhaskar Jadhav यांची Ramdas Kadam, Yogesh Kadam यांच्यावर जोरदार टीका