राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया काय ?

| Updated on: Feb 12, 2023 | 10:01 AM

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा म्हणजे ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय कधी मान्य झाला ? महाराष्ट्रात राज्यपाल यांच्याविरोधात उठाव झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, […]

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा म्हणजे ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय कधी मान्य झाला ? महाराष्ट्रात राज्यपाल यांच्याविरोधात उठाव झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात एकच राळ उठली. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागला. पण, आता त्यांच्या लक्षात आले की निवडणुकांमध्ये हा ही एक मुद्दा विरोधकांच्या हाती असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतरही कारवाई का केली नाही याला तोंड कसे दयायचे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. निर्णय उशीर घेतला पण, देर आये, दुरुस्त आये असा टोला त्यांनी लगावला.

Published on: Feb 12, 2023 10:01 AM
क्या बात है! अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली प्रवास, एक्स्प्रेसवेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
ठाकरे गट म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, शितल म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल