मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय? एक तर अंतयात्रा नाही तर विजय यात्रा
जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे मराठा समाजाला OBC तुन आरक्षण द्यावंच लागेल. नाही तर यापुढचं आंदोलन सरकारला झेपणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. शरद पवार यांचा आम्हाला पाठींबा असल्याचं सिद्ध केल्यास आंदोलनातून माघार घेऊ असं प्रति आव्हान जरांगे यांनी दिलंय.
मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय? सरकारला अल्टिमेटम दिल्याप्रमाणे पुढच्या सात दिवसांमध्ये मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळणार आहे का? या सर्व प्रश्नांवर जरांगे पाटलांनी TV9 मराठीच्या मुलाखतीमधून उत्तरं दिली आहेत. आपला समाज हेच आपल्यासाठी मोठं संपत आहे. त्यांचा मुलगा म्हणून मी शेवटपर्यंत त्यांचं जे स्वप्न आहे. ते पूर्ण केल्याशिवाय हटणार नाही. मग उपोषण करुन माझी अंतयात्रा जरी निघाली. तरी हरकत नाही. एक तर माझी अंतयात्रा निघेल नाही तर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत. दोन्हीपैकी एक होईल. त्यामुळे सरकारनं तयार रहावं. माझ्या मायबापांच्या चेहऱ्यावर, मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघितल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
Published on: Oct 18, 2023 11:09 PM