Ramdas Athawale : मुंबई मनपा निवडणूकीत मनसेची गरजच काय? रामदास आठवलेंचा पुनरुच्चार

| Updated on: Sep 05, 2022 | 5:23 PM

भाजपसोबत आरपीआय आणि आता शिंदे गट असल्याने मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वीही त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मनसेबरोबर युती झाली तर आरपीआयचे नुकसान होईल अशी शक्यता असल्यानेच ते मनसेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुंबई : एकीकडे (BJP & MNS) भाजप आणि मनसेची (Mumbai Municipal) मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर युती होईल अशी चर्चा जोर धरत आहे. तर दुसरीकडे याची आवश्यकताच नसल्याचे आरपीआयचे (Ramdas Athawale) रामदास आठवले हे सांगत आहे. भाजपसोबत आरपीआय आणि आता शिंदे गट असल्याने मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वीही त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मनसेबरोबर युती झाली तर आरपीआयचे नुकसान होईल अशी शक्यता असल्यानेच ते मनसेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गतवेळी भाजप आणि आपपीआयने 82 जागा निवडूण आणल्या होत्या. यंदा तर पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे मताधिक्य घेण्यामध्ये काही अडचण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 05, 2022 05:23 PM
Prashant Bamb : शाळांची गुणवत्ता खलावलेलीच, प्रशांत बंब यांनीच घेतली विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम
Kishori Pednekar : धोकेबाज कोण, जनतेला सर्वकाही ज्ञात, पेडणेकरांच्या निशाणावर भाजप पक्ष