Aditya Thackeray on Raut | कसले बंडखोर? हे तर गद्दार, बंडखोरीला हिंमत लागत असल्याचा सांगत आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

| Updated on: Aug 01, 2022 | 4:30 PM

Aditya Thackeray on Raut | बंडखोरी करायला हिंमत लागते. त्यामुळे सध्याचे बंडखोर हे गद्दार आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी पुन्हा लगावला.

Aditya Thackeray on Raut | शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी पुन्हा बंडखोरांवर (Rebel) तोफ डागली. हे कसले बंडखोर? असा प्रश्न करत, शिंदे गटातील आमदारांना त्यांनी पुन्हा एकदा डिवचले. बंडखोरी करायला हिंमत लागते. त्यामुळे सध्याचे बंडखोर हे गद्दार आहेत आणि ते विकल्या गेलेले असल्याचा गुद्दा त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) लगावला. शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर जल्लोष केल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. गेल्या महिनाभरापासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांवर तोंडसूख घेत आहेत. त्यांच्यावर शाब्दिक बॉम्ब टाकत आहेत. यापूर्वी शिंदे गटाने ही टीका सौम्यपणे घेतली. पण शाब्दिक हल्ले वाढल्यानंतर त्यांनी ही पलटवार केले. आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हा पलटवार केला.

Mallikarjun Kharge on Raut | सत्ताधाराऱ्यांना विरोधक मुक्त संसद हवी, मल्लिकार्जून खरगे यांची टीका
Gopichand Padalkar on Raut | तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नाहीच’ गोपीचंद पडाळकर यांनी हाणला टोला