Video | जरांगेंना आपण एक फोन जरी केल्याचे जर सिद्ध झाले…,’ काय म्हणाले शरद पवार

| Updated on: Feb 27, 2024 | 9:45 PM

शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी निवडणूकासंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. लोकसभा निवडणूकासंदर्भात बैठका होत असून त्यांनी वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना मनोज जरांगे प्रकरणात बोलविता धनी कोण हे शोधण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमल्याप्रकरणात पत्रकारांनी प्रश्न विचारले.

पुणे | 27 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली स्क्रीप्ट वाचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यात प्रश्न विचारला असता त्यांनी जबाबदार लोकांनी जबाबदारीने बोलले पाहीजे. इतकं पोरकट वक्तव्य मी कधीही ऐकले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या पासूनचे मुख्यमंत्र्यांना मी ऐकले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जरांगे यांना  त्याचं उपोषण सुरु असताना पहिल्यांदा मीच भेटलो होतो. त्यावेळी त्यांना आपण समाजात अंतर वाढेल असे काही बोलू नका असे सांगितले होते. मराठा समाजासाठी तुमचा आग्रह समजू शकतो एवढंच आपले बोलणे झाले. त्यानंतर आपली त्यांची भेट झालेली नाही. जरांगे यांचा बोलविता धनी शोधण्यासाठी एसआयटी नेमली जाणार आहे. त्यावर विचारले असता, पवार यांनी जरांगेंना आपण एक फोन जरी केल्याचे सिध्द झाले तर आपण वाटेल ते मान्य करु असे पवार म्हणाले. यावेळी शरद पवार बारामतीत गुंतून पडणार असे विरोधक म्हणत आहेत यावर लोकशाहीत कोणालाही कुठेही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. आपण 14 निवडणूका लढल्यात त्यातील सात लोकसभेच्या आहेत. तेव्हा नाही गुंतून पडलो तर आता गुंतून पडणार का ? असा सवाल त्यांनी केला. आंतरवाली सराटी आरक्षण आंदोलनात राजेश टोपेंची मदत सरकारने स्थानिक म्हणून घेतली होती आणि त्यांच्यावरच प्रहार होत आहेत. उद्या मदत करताना सरकारवर विश्वास कोण ठेवेल असा सवाल शरद पवार यांनी केला.

Published on: Feb 27, 2024 09:42 PM