MLA Rohit Pawar : त्या जे करत आहेत ते राजकारण आहे’ आमदार रोहित पवारांची नवनीत राणावर टीका
महाराष्ट्राने आख्या देशाला दाखवून दिले आहे की जे अल्टीमेटम काही लोंकानी दिले होते. त्यावेळी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन, कुठल्याही गरीब लोकांवर अन्याय होऊ नये यासाठीमंदिरावरील स्पीकर, मशिदीवरील भोंगे काढले. कारण इथली जनता सुज्ञ आहे.
नागरपूर – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तुरूंगातून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन दिले, तुम्ही कुठलाही मतदारसंघ निवडा मी लढायला तयार आहे. या आवाहन बोलताना आमदार रोहित पवार (MLE Rohit Pawar) म्हणाले की, त्यांनी आवाहन दिले, त्याच्या बातम्या झाल्या त्या टीव्हीवर आल्या. त्यांच्या मनामध्ये जो हेतू होता पुन्हा एकदा टीव्हीवर याचे तो पुन्हा एकदा साध्य झाला. ते जे करत आहेत ते राजकारण (Politics )करत आहेत. अशी टीका त्यांनीकेली आहे. तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्राने आख्या देशाला दाखवून दिले आहे की जे अल्टीमेटम काही लोंकानी दिले होते. त्यावेळी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन, कुठल्याही गरीब लोकांवर अन्याय होऊ नये यासाठीमंदिरावरील स्पीकर, मशिदीवरील भोंगे काढले. कारण इथली जनता सुज्ञ आहे. मनसे व भाजपकडून जे सुरु आहे ते राजकारण आहे ,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.