एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. परंतू राज्यात अजून सरकार स्थानापन्न झालेले नाही. कारण मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं यावरुन महायुती गुंता वाढला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे असे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. या संदर्भात एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील याबाबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणूका लढविण्यात आल्यानंतर हे मोठे यश मिळाल्याने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे अशी मागणी शिंदे गटाचे नेते करीत आहेत. परंतू भाजपाला सर्वाधिक जागा मिळून तो पक्ष सर्वात मोठा असल्याने यावेळी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद द्यावे अशी भाजपा कार्यकर्त्यांनी मागणी आहे. केंद्रातील नेतृत्वाने देखील याला पाठींबा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अलिकडे ट्वीटरवर एक पोस्ट टाकून वर्षा निवासस्थानी गर्दी करु नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आता एकनाथ शिंदे वेगळे काही बोलतील असे वाटत नाही असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलेले आहे. एकनाथ शिंदे आता केंद्राकडे बोट दाखवून ते केंद्र सरकारशी बोलून बैठकीत जो निर्णय होईल तो स्वीकारु असे जाहीर करतील असे वाटत आहे असेही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटले आहे.