प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीसमोर नतमस्तक, ठाकरे गटाची कोंडा; उद्धव ठाकरेंची भूमिका काय? पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Jun 18, 2023 | 8:33 AM

शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "औरंगाबादच्या समाधींना भेट दिली आहे. इथे आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे. ती वास्तूदेखील बघायला आलेलो आहे", असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

औरंगाबाद : शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “औरंगाबादच्या समाधींना भेट दिली आहे. इथे आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे. ती वास्तूदेखील बघायला आलेलो आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.  औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्याने टीकेचे सूर उमटू लागले.आंबेडकरांच्या या कृतीवर शिंदे गट आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनीही जोरदार टीका केली आहे. तर आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. ठाकरे गटाने आता याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तर वंचित वेगळा पक्ष, गल्लत करू नका, अशी भूमिका ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी मांडली. युतीत असल्यामुळे आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरेंची अडचण होणं स्वाभाविक आहे, पण आज होणाऱ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार यासाठी पाहा या संदर्भाती स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 18, 2023 08:19 AM
शिंदे गटाच्या वर्धापन दिनावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘जागतिक गद्दार दिन…’
नव्या वादाची शक्यता? प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, फुलंही उधळली, डोकंही टेकवलं