यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू

| Updated on: Mar 25, 2022 | 1:18 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह काढला आहे. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे.

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह काढला आहे. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का बघावं लागेल. हा पेन ड्राईव्ह… तो पेनड्राईव्ह… आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. बरं का फाट्कन, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक भंपक आणि खोटं प्रकरण तयार करतात. कसं काय यांना हे बाळंतपण जमतं माहीत नाही. कुठून सुईणी आणतात हे बाळंतपण करायला खोट्याप्रकरणाची. महाराष्ट्रात हे नवीनच आहे. यांनी पेनड्राईव्हची फॅक्ट्री काढली आहे का? केंद्रीय चौकशी समिती आणि यांची मिलीभगत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे. काही दिवसाने ते तामिळनाडूत जातील. हे होत आहे. जे करायचं आहे ते करा. तुमच्या शंभर पेनड्राईव्हवर आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडेल, असा इशाराच राऊत यांनी दिला. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

Published on: Mar 25, 2022 01:18 PM
Sangali : अहिल्यादेवी स्मारकाचा लोकार्पण सोहळा, भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
नाशिकमध्ये 3 वर्षाचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली