Shivsena Political Crisis | रामायण आणि महाभारत कुणी घडवले? पेडणेकरांचा गोगवलेंना प्रश्न – TV9

| Updated on: Jun 24, 2022 | 8:06 PM

किशोरी पेडणेकर यांनी गोगावले यांना प्रश्न विचारणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर ज्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी गोगावले यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता गोगावले यांनी फोन ठेवला

मुंबई : एकनाथ शिंदेनी रचलेल्या राजकीय नाट्याचा आणि बंडखोरीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काल फेसबूक लाईव्ह करत आपली बाजू मांडली होती. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे नरमाईने सांगितलं होतं. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाईव्ह करत कडक भूमिका घेतली. तसेच माझ्या फोटोशिवाय आणि शिवसेनेच्या नावाशिवाय जगून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी शिंदे यांना केले. तसेच त्यांनी हेच आवाहन शिंदे गटाला जाऊन मिळालेल्या आमदारांना देखील केलं आहे. यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतिक्रिया दिली. ज्यात त्यांनी हे सगळं फक्त उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदामुळे झाल्याचं म्हटलं. याचवेळी गोगावलेंना किशोरी पेडणेकर यांनी प्रश्न विचारणार असल्याचे सांगण्यात आले. तर ज्या वेळी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी गोगावलेंना यांनी प्रश्न केला की, रामायण आणि महाभारत कुणी घडवले? त्यावेळी गोगावले यांनी त्याला उत्तर न देता फोनच कट केला.

Published on: Jun 24, 2022 08:05 PM
आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ द्या
Rajesh Kishrsagar at Guwahati| शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीत एकनाथ शिंदेंच्या गोटात