पवार यांच्याबद्दल काळजी दाखवली मात्र राऊत यांच्या धमकीवर भाजप नेत्यानं केला ‘मच्छर’ आणि ‘बूट’चा उल्लेख
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोनवर ही धमकी दिली. तर सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा तुम्हाला गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राजकारण खळबळ उडाली होती. याचा धुरळा शांत होतो ना होतो तोच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोनवर ही धमकी दिली. तर सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा तुम्हाला गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली. त्यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी राऊत यांना धमकी कोण देऊ शकतं. तेच तर दुसऱ्यांना धमक्या देतात. त्यांना सुरक्षा देण्यासाठी ते कोण आहेत, असा सवाल केला. तर आता मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही. पाया खालती थोडा बुट हलवला तरी मच्छर मरतो. त्यामुळे राऊत यांना धमकी आली तरी काही विषय नाही. राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांना धमकी कोणाकडून आली हे त्याला विचारा, असेही नितेश राणे म्हणाले. तर 2024 ला राऊत बाहेर नसणार. मग सत्ता कुठून येणार. टोल नाक्यावर बसून चर्चा करून सत्ता येत नाही असाही टोला त्यांनी लगावला आहे.