नितेश राणे यांच्या अमरावतीत दौऱ्यावेळी राडा; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोणता प्रयत्न? पोलिसांनी काय केलं?

| Updated on: Jun 10, 2023 | 2:09 PM

राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर किंवा संधी मिळेल तेथे ठाकरे गटावर नितेश राणे हे आपली तोफ डागत असतात. यातूनच त्यांच्याविरोधात आता ठाकरे गटात असंतोष पहायला मिळत आहे.

अमरावती : भाजपचे नेते आमदार नितेश राणे हे संधी मिळेल तेथे ठाकरे गटासह उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असतात. ते राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर किंवा संधी मिळेल तेथे ठाकरे गटावर नितेश राणे हे आपली तोफ डागत असतात. यातूनच त्यांच्याविरोधात आता ठाकरे गटात असंतोष पहायला मिळत आहे. याचदरम्यान नितेश राणे हे अमरावती दौऱ्यावर असताना आज त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणा बाजी केली. नितेश राणे यांच्या गाडीसमोरच ही नारेबाजी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काळ तेथे वाचारण तंग झालं होतं. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलं.

Published on: Jun 10, 2023 02:09 PM
‘…तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा!’ शिवसेना नेत्यानं भाजपला डिवचलं
खिल्ली उडवणाऱ्या निलेश राणे यांना राष्ट्रवादी नेत्याचा पुन्हा इशारा; ‘पुन्हा बोलाल तर नक्कीच झोप उडवू’