राऊत याचं नाव ऐकताच फडणवीस भडकले? तीनच शब्दात विषय गोल; पहा काय म्हणाले?
यावरून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर याचमुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी, विरोधकांवर छापे तुमच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांवर, आमदारांवर अशी छापेमारी करावी असा सल्ला दिला आहे.
मुंबई : ठाकरे गटातील नेत्यांवर किंवा त्यांच्या निकटवर्तींयावर होणाऱ्या ईडीच्या सततच्या कारवाईवरून खासदार संजय राऊत चांगलेच भडकले आहेत. त्यांनी यावरून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर याचमुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी, विरोधकांवर छापे तुमच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांवर, आमदारांवर अशी छापेमारी करावी असा सल्ला दिला आहे. तर यावेळी फडणवीस यांच्यावर हल्ला चढवताना, भाजपचे आमदार राहुल कूल, राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भुसे यांची चौकशी का करत नाही असा सवाल केला. तसेच या तिघांची ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी करत आव्हान दिलं होतं. त्यावरून पत्रकारांनी फडणवीस यांना विचारलं असता ते भडकलेच. तसेच थेट पत्रकारांनाच प्रतिसवाल करत कोण आहे संजय राऊत? कोण? कोण? असं म्हटलं आहे. यामुळं आता आणखीन वार पलटवार होण्याची शक्यता आहे.