कश्मीरी पंडीतांची घरवापसी कधी होणार?, संजय राऊत यांचा अमित शाह यांना सवाल

| Updated on: Mar 15, 2024 | 12:46 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाद्वारे निवडणूका हायजॅक करायच्या आहेत. त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने त्यांना ही यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आपली माणसे नेमण्याचे काम केले आहे. निवडणूक आयोगा घटनेनूसार काम करीत नसल्याचे अलिकडच्या अनेक उदाहरणावरुन दिसत आहे. पंतप्रधानांकडे थोडी जरी नैतिकता असेल तर ते एक दिवसही पदावर राहणार नाहीत अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई | 15 मार्च 2024 : केंद्र सरकारने नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) लागू केला आहे. या कायद्यानूसार शेजारील मुस्लीम  देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. हा कायदा उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परदेशातील नागरिकांना येथे आणण्यापूर्वी अमित शाह यांनी कश्मीरातील कश्मीरी पंडीतांची घरवापसी झाली का? मणिपूरमधील आपलेचे देशबांधवांवर राज्य सोडायची वेळ का आली ? पुलावामाला जबाबदार कोण ? या हल्ल्याचा राजकीय फायदा कोणी घेतला याची उत्तरे आधी द्यावीत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते वकील असीम सरोदे यांनी शिवसेना सोडून गेले नेते पुन्हा शिवसेनेत येण्याची तयारी करीत असल्याचे म्हटले आहे. त्यावर संजय राऊत यांनी राहीले ते मावळे आहेत. जे आम्हाला सोडून गेलेत ते आमच्यासाठी मेले आहेत अशी भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांवर विचार करायला सांगितले आहे. आता त्यांच्या निर्णय त्यांनी कळवायचा आहे. आम्ही पाडापाडी करण्यासाठी नव्हे तर भाजपाला हरविण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमातून जागा वाटपाची बोलणी करु नयेत असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

Published on: Mar 15, 2024 12:34 PM