‘या सर्व योजना चालू ठेवायच्या की नाही….,’ काय म्हणाले अजितदादा
केंद्रात आणि राज्यात समविचाराचे सरकार आणले तरच या सर्व लोकोपयोगी योजना सुरु राहणे शक्य होणार आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यात मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी या योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात म्हटले आहे.
बहिण माझी लाडकी योजना, प्रशिक्षाणार्थींना विद्यावेतन, मुलींना मोफत शिक्षण या सर्वा योजना जर पुढे कायम चालू ठेवायच्या असतील तर आमच्या महायुतीलाच विजयी करा ? लोक म्हणतील राजकारण करताय..काय राजकारण नाही खरं तेच सांगतोय असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिला.ते म्हणाले की केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आलेले आहे. तर महाराष्ट्रात देखील आपले महायुतीचे सरकार आले तरच या योजना सुरु राहणार आहेत. आम्ही मेट्रोचे आण आणि रस्त्याचे जाळे आणायचे असेल कायदा सुव्यवस्था चांगली राखायची असेल आणि आता आम्ही कांदा निर्यात बंदी कायमची करायची आहे.हे सर्व करण्यासाठी राज्यात केंद्राच्याच विचाराचे सरकार आणायचे आहे असे अजितदादा यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 17, 2024 03:34 PM