बच्चू कडू यांच्याकडे कोणत्या जातीचं प्रमाणपत्र? जरांगे यांच्या भेटीदरम्यान सांगितली ‘अंदर की बात… ‘

| Updated on: Sep 04, 2023 | 10:56 PM

जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आतापर्यंत जात म्हणून दुर्लक्ष केलं असं म्हटलं. सरकारला विनंती त्यांनी अंत पाहू नका. नाही तर सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही...

जालना : 4 सप्टेंबर 2023 | मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर माझा विश्वास आहे. मी जातीची लढाई लढलो नाही. दिव्यांग आणि शेतकऱ्यांची लढाई लढलो. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला असता तर कोणी आरक्षण मागायला आलं नसतं. मात्र, आजवर जात म्हणून दुर्लक्ष केलं आणि शेतकरी म्हणून मी ही दुर्लक्षित केलं. आमच्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करू. सरकारने आंदोलकांकडे आंदोलक म्हणून पहावे. इथे येणाऱ्याना सेल्फीच पडलंल. त्यांच्या आरोग्याचे पडले नाही. इथे सगळे स्वार्थी येऊन गेल. आज जी ज्योत पेटवली आहे त्याचा सन्मान करणे महत्वाचे आहे. वेळ पडली तर एक दिवस मी पण उपाशी राहील. सरकारला विनंती करतो की अंत पाहू नका. नाही तर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या tc वर मराठा आहे. मात्र, महसुली कागदपत्रात कुणबी आहे. महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष, वेगळा कायदा करायच्या भानगडीत बोलू नका अशी टीका प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली. जालना येथे मनोज जरांगे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Published on: Sep 04, 2023 10:55 PM
संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल, आता नेमकं काय केलं?
निजाम काळातला गुंता आणि मराठा आरक्षण, अनेक वर्षांपासून होतेय ती एक मागणी