गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, ‘आयुष्य फार छोटं आहे..’

| Updated on: Sep 28, 2023 | 5:51 PM

छत्रपती शिवाजी महाराज देखील आपल्या स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी सर्वांनाच आपल्या कुटुंबाप्रमाणे ठेवले. सर्वांना एकत्र घेतले तरच आपला देश प्रगत होऊ शकतो.

सातारा : 28 सप्टेंबर 2023 | गणपती विसर्जनाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा मिरवणुकीचा दिवस सर्वांनी शांततेत पार पाडावा. कोणतेही गालबोट लागू नये. सर्व धर्मातील लोकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा असे ते म्हणालेत. गणरायाच्या उत्सवामुळे सर्व लोकांचे एकत्रीकरण होते. हा उत्सव साजरा करत असताना सर्व धर्मातील लोकांना एकच विनंती कोणीही भेदभाव करू नये. आयुष्य फार छोटं आहे. कारण, नसताना काही क्रियानिष्ठ लोक मतभेद निर्माण करतात. गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की हा पूर्ण देश कुटुंबाप्रमाणे रहावा. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी सर्वांनाच आपल्या कुटुंबाप्रमाणे ठेवले. सर्वांना एकत्र घेतले तरच आपला देश प्रगत होऊ शकतो. या देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक एकोप्याने राहतात हे इतर देशांमध्ये कुठेही नसेल, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

Published on: Sep 28, 2023 05:51 PM