‘शरीर माणसाचं मात्र तोंड डुकराचं’, राष्ट्रवादीच्या आमदाराची जीभ घसरली, कुणावर केली टीका?

| Updated on: Oct 14, 2023 | 11:39 PM

सरकारने जर धनगरांना आदिवासीत आरक्षण देण्याची चूक केली तर मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू. मुंबईला जो पाणीपुरवठा होतो आणि जे रस्ते जातात ते आदिवासी भागातून जातात. सरकारला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल.

अहमदनगर : 14 ऑक्टोबर 2023 | अजित पवार हे आमच्यासोबत आहेत. आदिवासींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही हा शब्द त्यांनी दिलाय. अजितदादा यांच्यासोबत गेलो तेव्हा आमची मागणी हीच होती की आदिवासींमध्ये घुसखोरी नको. स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न करू असा शब्द त्यांनी दिला. अजितदादा यांना सांगुनच सरकारविरोधात आंदोलन करतोय. गरज पडल्यास आम्ही 25 आमदार राजीनामा द्यायला तयार आहोत असा इशारा अजितदादा गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला. ज्याचे डिपॉजीट जप्त झालं तो पवार कुटूंबावर गरळ ओकतोय. खरं तर पडळकरांची बोलण्याची लायकी नाही. टिका करतोय म्हणून भाजपने पडळकरांना जवळ केल. आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी पडळकरांची बडबड चालू देणार नाही. पडळकरांच शरीर माणसाच मात्र तोंड डुकराचं अशी टीका त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली.

Published on: Oct 14, 2023 11:36 PM
‘जरांगे पाटलांना लाईटली घेऊ नका’, देवेंद्र फडणवीस यांना कुणी दिला इशारा?
‘राजपूत, पाटील पदवी आहे तशीच मराठा ही पदवी’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? सदावर्ते म्हणजे…