maharashtra politics : शिवसेना नेत्याची ठाकरे पिता-पुत्रावर टीका, तर ठाकरे गटातील आमदारच संपर्कात असल्याचा केला दावा
शिवसेना शिंदे गटातील नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना निशाना साधला आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटातील आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात काहिना काही कारणाने टीका किपण्णी होत असते. आरोप-प्रत्यारोप होत असतात. आताही शिवसेना शिंदे गटातील नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना निशाना साधला आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटातील आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यावरून सध्या ठाकरे गटात खळबळ उडालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा करत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून घरातून ऑनलाइन संपर्क साधला नसता तर शिवसेना फुटली नसती. त्यातुनच शिवसेनेत उठाव झाला. तर आदित्य ठाकरे यांचं जेवढं वय आहे, त्या पेक्षा जास्त कालावधी आम्ही शिवसेना बळकट करण्याचं काम केलं. त्यामुळे आरोप करू नयेत. तर आता त्यांनी वरळीतून उभं राहुन दाखवावं असेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटातील काही स्टॅंडिंग आमदार आणि काही या ठिकाणी थोडाफार मतांना पराभूत झालेले नेते हे आपल्या पक्षातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. ते निवडणूक काळात शिंदे गटात येतील असा दावा केला आहे.