Vinayak Mete : मराठा समाजाच्या बैठकीची वेळ कोणी बदलली? वेळेवरुन मराठा क्रांती मोर्चचा सवाल
वेळेत नेमका बदल झाला तरी कसा असा सवाल आता मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आबासाहेब पाटील यांच्यानंतर आता दिलीप पाटील यांनी देखील या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय आदेश देतात हे पहावे लागणार आहे. बैठकीची वेळ, उशीरा मिळालेले रुग्णसेवा यावरुन सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
कोल्हापूर : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आता वेगवेगळे सवाल उपस्थित होऊ लागले आहे. मराठी सामाजाच्या आरक्षणाच्या अनुशंगाने रविवारी बैठक असल्याचे शनिवारी सकाळीच कळवण्यात आले. रविवारी दुपारी 4 च्या दरम्यान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण अचानक यामध्ये बदल झाला आणि रात्री 7 वाजता पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की ही बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे. त्यामुळे वेळेत नेमका बदल झाला तरी कसा असा सवाल आता मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आबासाहेब पाटील यांच्यानंतर आता दिलीप पाटील यांनी देखील या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय आदेश देतात हे पहावे लागणार आहे. बैठकीची वेळ, उशीरा मिळालेले रुग्णसेवा यावरुन सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.