भांगेची नशा नेमकी कुणाला चढली? मंत्री आणि माजी मंत्री यांच्यात जोरदार जुंपली

| Updated on: May 26, 2023 | 8:32 PM

शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक‌ फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला. ना एक अँब्युलन्स दिली गेली. याची नाराजी माझ्या मनात आहे.

सातारा : कराड ते सातारा अशी चार दिवस शेतकरी पदयात्रा काढली. मात्र, या पदयात्रेत पालक मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काही सोय केली नाही. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे माहित नाही. मात्र, तो भाग्यवान माणुस आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक‌ फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला. ना एक अँब्युलन्स दिली गेली. याची नाराजी माझ्या मनात आहे अशी भावना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर बोलून दाखविली. तसेच, सत्ता भांग पिल्यासारखी अंगात आले की माणुस डुलायला आणि नाचायला लागतो. मात्र, नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असते अशी टिकाही त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच नाव न घेता केली होती. त्यावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चांगलाच पलटवार केलाय. सदाभाऊच भांग पित असतील त्यामुळे त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केले असा टोला देसाई यांनी लगावला. आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते असेही ते म्हणाले.

Published on: May 26, 2023 08:32 PM
पुण्यात लव्ह जिहाद, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उजेडात आणले प्रकरण, सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका
”सत्ता ही भांग…” या वक्तव्यावर शंभूराजे देसाई यांचा पलटवार, म्हणाले….