ती विदर्भातील कुणबी, तो मराठवाड्यातील मराठा, मग मुलगा कोण? कुणबी मराठा वाद कुणी पेटवला?

| Updated on: Oct 22, 2023 | 10:36 PM

सामान्य मराठा समाज आत्महत्या करत आहे त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का असा सवाल नारायण राणे यांना केलाय. राणे साहेबांचा बोलविता धनी दुसराच कुणी तरी आहे. मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नसल्याने ह्यांच्या पाया खालील वाळू सरकली आहे

हिंगोली | 22 ऑक्टोंबर 2023 : शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असे विधान केलंय. यावरून मराठवाड्यातील मराठा बांधवांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नारायण राणे ते आता पूर्वीचे नारायण राणे राहिले नाहीत. जस जसा जरांगे पाटील यांचा अल्टीमेट्म जवळ येत आहे तशी यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळेच हे अचानक काही ही स्टेटमेंट देत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. 96 कुळी, 92 कुळी हा वाद महाराष्ट्रात असूच शकत नाही असेही ते म्हणालेत. माझी पत्नी विदर्भातील ती कुणबी आहे. मी मराठवाड्यातील मराठा आहे. मग, माझा मुलगा काय झाला? असा थेट सवाल मराठा बांधवांनी राज्य सरकारला विचारला.

Published on: Oct 22, 2023 10:36 PM