Special Report : होत्याचं नव्हतं झालं!, स्वप्नांचा प्रवास बुलढाण्यातच थांबला; याला कोण जबाबदार?
महाराष्ट्रच काय तर अख्या देश सुन्न झाला. तर बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघाताला आता जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.
बुलढाणा : 1 जुलैच्या रात्री नागपुरहून पुणे असा प्रवास करणाऱ्या 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रच काय तर अख्या देश सुन्न झाला. तर बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघाताला आता जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे. कारण या खासगी बसने प्रवास करणाऱ्या त्या 25 जणांत एक अख्ख कुटूंब, एक नोकरीला जाणारा, एक शिक्षणासाठी बाहेर पडलेली मुलगी तर एक ब्युटीशियन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीचा शेवट झाला. त्या 25 जणांचा त्या अपघातात लागलेल्या आगीत बसमध्येच अंत झाला. पण त्याचबरोबर त्यांनी पाहिलेल्या अनेक स्वप्नांची देखील राख झाली. आता त्यांची नावं कळाली आहेत. पण त्यांची ओळख पटत नसल्याने त्यांच्यावर बुलढाणा येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या त्या स्वप्नांचं काय? या अपघाताला नेमकं कोण जबाबदार असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट