अरे काय गुन्हा दाखल करायचे ते कर, आमदार रोहित पवार याचं खुलं आव्हान कुणाला?

| Updated on: Nov 18, 2023 | 11:49 PM

छगन भुजबळ यांच्यांया भाषणातील स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिलेली वाटली. जी व्यक्ती माता जिजाऊ यांचा वंशज मानून पुस्तक लिहितात त्यांच्याकडून असे वक्तव्य योग्य नाही. कार्यकर्त्यांचे मी समर्थन करीत नाही. त्यांनी पवार साहेब यांच्याबाबत तसे वक्तव्य करायला नको होते.

Follow us on

बीड | 18 नोव्हेंबर 2023 : आमची युवा संघर्ष यात्रा आज बीड जिल्ह्यात पोहचली आहे. तरुणांनी आमचं भव्य स्वागत केलं आहे. अनेक प्रश्न घेवून आम्ही ही यात्रा नागपूरपर्यंत घेवून जातोय. मंत्री छगन भुजबळ यांचं अंबडमधील भाषण मी पूर्णपणे ऐकले नाही. मात्र, त्या भाषणातील स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिलेली वाटली. भुजबळ साहेब अनुभवी नेते आहेत. त्यांचं भाषण कोणालाही पटलेले नाही. मंत्री असताना त्यांचं सरकारमध्ये कोणी ऐकत नसतील तर गरिबांचे कोण ऐकेल असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. या मागे वेगळी रणनीती आहे. याचा आम्हाला वास येतोय. जी व्यक्ती माता जिजाऊ यांचा वंशज मानून पुस्तक लिहितात त्यांच्याकडून असे वक्तव्य योग्य नाही. कार्यकर्त्यांचे मी समर्थन करीत नाही. पण, नामदेव जाधव यांनी पवार साहेब यांच्याबाबत तसे वक्तव्य करायला नको होते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी सदैव राहीन. जाधव यांना जे काही गुन्हा दाखल करायचे असतील ते त्यांनी करावे. आम्ही कोणाला घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.